Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स

Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स

पूर्वीच्या काळात तांब्याची भांडी खूप वापरली जात होती. या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आजकाल या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा वाढला आहे. तुम्हीसुद्धा प्लास्टिकची बाटली पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर, तांब्याच्या बाटलीने पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. दैनंदिन वापरात असलेली तांब्याची बाटली बाहेरुन खूप काळपट दिसू लागते. अशावेळी ही बाटली स्वच्छ करण्यासाठी, काही साध्या सोप्या टिप्स गरजेच्या आहेत.

तांब्याची काळी पडलेली बाटली कशी स्वच्छ करावी?

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी वर्षानुवर्षे चिंचेचा वापर केला जात आहे. चिंचेने तुम्ही भांडी नवीनसारखी चमकू शकता. यासाठी चिंचेला अर्धा तास भिजवा. त्याची पेस्ट बनवा आणि काही वेळ बाटलीला बाहेरुन लावून ठेवा. त्यानंतर चांगली घासून स्वच्छ करा. नंतर पाण्याने स्वच्छ करा आणि वाळवत ठेवा.

तांब्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर हा महत्त्वाचा आहे. लिंबू आणि मीठाची पेस्ट तयार करा. हे मिश्रण बाटलीवर लावावे. त्यानंतर काही वेळ हे व्यवस्थित घासून घ्यावे. नंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ करावे.

तांब्याच्या बाटली स्वच्छ करण्यासाठी, बेकिंग सोडा सुद्धा सर्वात उत्तम मानला जातो. बेकिंग सोड्यामुळे हट्टी डाग काढण्यास मदत होते. तसेच बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवल्याने, बाटलीच्या आतील भागही स्वच्छ होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;