अबूधाबीहून दोन कोटीचं सोनं आणलं आणि विमानात सीटखाली लपवलं, प्रवाशाने पुढे जे केलं ते ऐकून कस्टम अधिकारीही हैराण

अबूधाबीहून दोन कोटीचं सोनं आणलं आणि विमानात सीटखाली लपवलं, प्रवाशाने पुढे जे केलं ते ऐकून कस्टम अधिकारीही हैराण

तस्करी करण्यासाठी आणि पकडले जाऊ नये म्हणून आरोपी शक्कल लढवत असतात. मात्र अबूधाबीहून आलेल्या प्रवाशाने सोने तस्करीसाठी जी युक्ती लढवली ते ऐकून सीमाशुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावले. या प्रवाशाला चेन्नई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. हा आरोपी अबूधाबीहून मुंबईत दोन किलो सोनं घेऊन आला होता. तस्करी करताना पकडले जाऊ नये म्हणून आरोपीने भन्नाट कल्पना लढवली पण अखेर तो जाळ्यात अडकलाच.

काय आहे प्रकरण?

हा तस्कर 12 जून रोजी इंडिगो विमानाने अबूधाबीहून 2 कोटींहून अधिक किंमतीचं सोनं घेऊन मुंबईत आला. मात्र त्याने सोनं सोबत न घेता विमानात सीटखालीच लपवून ठेवलं. मग तो सुरक्षित मुंबई विमानतळाबाहेर पडला. यानंतर तो मुंबईहून चेन्नईला गेला. अबूधाबीहून तो ज्या विमानाने मुंबईत आला त्या विमानाचं लाईव्ह ट्रॅकिंग तो करत राहिला. लाईव्ह ट्रॅकिंगद्वारे 14 जून रोजी हे विमान कोलकाताहून चेन्नईला उड्डाण करणार असल्याचे त्याला समजले. यानंतर तो चेन्नईहून कोलकात्याला गेला. आरोपीने तेच विमान आणि तीच सीट बुक करत कोलकात्याहून चेन्नईला आला. यादरम्या त्याने सीटखालून लपवलेलं सोनं ताब्यात घेतलं.

चेन्नई विमानतळावरून हे सोनं घेऊन तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. मात्र सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्याचा प्रयत्न फसला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्याकडे पेस्टच्या स्वरुपात सोनं आढळलं. आरोपीची चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला आणि सीमाशुल्क विभागाचे अधिकारीही कारनामा ऐकून हैराण झाले. अधिकाऱ्यांनी आरोपीकडून दोन कोटीहून अधिक किमतीचं सोनं जप्त केलं आहे. तसेच आरोपीने विमान प्रवास करण्यासाठी बोगस आधारकार्डचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. हे बोगस आधारकार्डही जप्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;