सासवड पालखीतळ काही तासांत चकाचक

सासवड पालखीतळ काही तासांत चकाचक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दोन दिवसांच्या सासवडमधील मुक्कामानंतर आज (दि. 24) सकाळी जेजुरीकडे रवाना झाला. पालखी सोहळय़ाच्या प्रस्थानानंतर सासवड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वत्र युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली. विशेषतः पालखी तळावर मोठय़ा प्रमाणात स्वच्छता करून काही तासांत तो चकाचक करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

मुख्याधिवारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिवारी मोहन चव्हाण व त्यांच्या पथकाने प्रतिवर्षाप्रमाणे हे स्तुत्य काम केले आहे.

 माउलींच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम, संत सोपानदेव व संत चांगावटेश्वर या पालख्यांचे प्रस्थान अशा स्थितीत शहरात केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप, शिळे अन्न, विक्रेत्यांनी फेकून दिलेला माल त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वारकरी उघडय़ावर शौचाला बसल्याने प्रचंड घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी, 4 ट्रक्टर, 14 घंटागाडय़ा, एक जेसीबी, एक अग्निशमन गाडी याद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे मोहन चव्हाण यांनी सांगितले. आज पालखी तळ, शॉपिंग सेंटर, मुख्य रस्ते त्याचप्रमाणे नव्याने तयार झालेल्या चंदन टेकडी ते बोरावके मळा या मार्गाची स्वच्छता करण्यात आली. दोन दिवसांत साधारण पन्नास ते साठ टन कचरा संकलन केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

गावठाण, वाढीव हद्द व अन्य परिसरातील स्वच्छता येत्या दोन दिवसांत पूर्ण करून जनजीवन पूर्वपदावर आणणार असल्याची ग्वाही डॉ. कैलास चव्हाण व मोहन चव्हाण यांनी दिली आहे. आजच्या मोहिमेत अदर पूनावाला यांच्या वतीने अकरा कर्मचारी व पाच गाडय़ाही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेसाठी माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, शहर समन्वयक राम कारंडे यांचेही योगदान लाभले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे
अनेकदा आपली नखे अचानक कोणत्याही ठोस कारणाशिवाय तुटण्याचा अनुभव आपण घेतला असेल. तुम्ही कोणतेही जड काम केलेले नाही, किंवा तुम्हाला...
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? डॉक्टरांकडून जाणून घ्या
CBSE Board Exam – सीबीएससी आता दोनदा घेणार दहावीची बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणेची संधी
‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा
मुंबई महापालिका शिवसेना जिंकणारच, चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन; यापुढील आंदोलन महायुतीच्या भ्रष्टाचाराविरोधात
स्वातंत्र्यासाठी योगदान न देणारे आता संविधानावर बोलत आहेत, मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका
Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर