म्हणून भ्रष्टनाथ शिंदे पळून वॉशिंग मशीन पार्टीत गेले, समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांची टीका
20 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. पण या मार्गावर फक्त खड्डेच आहेत. याच कारणामुळे भ्रष्टनाथ शिंदे यांनी पळ काढळा आणि वॉशिंग मशीन पार्टीत गेले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच हे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी या खड्ड्यांबाबतची एक बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून म्हटले आहे की, मे महिन्यात हीच बाब मी सांगितली होती. समृद्धी हायवेवर फक्त खड्डेच खड्डे आहेत, कुठेही हा मार्ग सरळ नाही. याचमुळे भ्रष्टनाथ शिंदे यांनी पळ काढळा आणि वॉशिंग मशीन पार्टीत गेले. तसेच काही आठवड्यांपूर्वीच या मार्गाचे उद्घाटन झाले होते. हे आहे महाराष्ट्रातलं भाजप सरकार असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List