बनावट अकाऊंट उघडून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

बनावट अकाऊंट उघडून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

महिला आणि तरुणींना त्रास देण्यासाठी बनावट नावाने सोशल मीडियावर अकाउंट उघडून अश्लील आणि द्वेषपूर्ण पोस्ट करत ब्लॅकमेल करणाऱ्याला अखेर दहिसर पोलिसांनी शुभम कुमार सिंगला बेडय़ा ठोकल्या. त्याने 300 हून अधिक महिलांचे अकाउंट उघडल्याचे तपासात समोर आले आहे.

दहिसर येथे तरुणी राहते. जानेवारी महिन्यात तिने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने अश्लील इंस्टाग्राम अकाउंट उघडले आहे. त्या बनावट अकाउंटवरून अश्लील आणि द्वेषपूर्ण पोस्ट अपलोड करत होता. तसेच तरुणीला ब्लॅकमेल करत तो तिची बदनामी करत होता. घडल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक देसाई, सहायक निरीक्षक अंकुश दांडगे, महिला उपनिरीक्षक श्रद्धा पाटील, कुदळे, देशपांडे, चिटणीस, चव्हाण, बिडगर, सोनल म्हस्के आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी फेसबुक आणि गुगल अकाउंटची माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक कर्नाटकच्या संदूर येथे गेले. तेथून पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;