नायगावातील बीडीडीवासीय वर्षअखेर नव्या घरात

नायगावातील बीडीडीवासीय वर्षअखेर नव्या घरात

बहुचर्चित व बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव येथील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 वर्षे जुन्या बीडीडी चाळींची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी घेतली आहे. या नव्या इमारतींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स असे नामकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील आठ टॉवरचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून वर्षअखेर काही रहिवाशांना नवीन घराच्या चाव्या मिळू शकतील, असेही सांगण्यात आले आहे. नायगाव बीडीडी चाळीत एकूण 3344 भाडेकरू असून त्यांना 500 चौ. फुटांचे घर मिळणार आहे.

आठ टॉवर्सचे काम पूर्णत्वाकडे, डिसेंबरपासून ताबा मिळणार

न्यू बीडीडी म्हणून ओळख असलेल्या चाळींचा पुनर्विकास पहिल्या टप्प्यात सुरू झाला. येथील 23 चाळी तोडून मोठ्या टॉवर्सचे काम सुरू झाले. आता येथील ओल्ड बीडीडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 19 चाळींच्या पुनर्विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये पोलीस वसाहत असलेल्या बीडीडी चाळ क्रमांक 9 ते 12 या चाळी तोडून तेथे नवीन टॉवर्सचे बांधकाम सुरू झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;