राजीव शुक्ला यांची BCCI च्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती, रॉजर बिन्नी हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्त
राजीव शुक्ला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर राजीव शुक्ला यांना बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष बनवले जाईल. माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी 2022 पासून या पदावर होते. आता त्यांचा कार्यकाळ 19 जुलै 2025 रोजी संपत आहे. यातच नवीन अध्यक्षांची घोषणा होईपर्यंत राजीव शुक्ला हे पद भूषवतील.
राज्यसभा खासदार राजीव शुक्ला सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. रॉजर बिन्नी निवृत्त झाल्यानंतर जुलैपासून ते कार्यवाहक अध्यक्ष देखील असतील. नवीन अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत राजीव शुक्ला यांना ही जबाबदारी सांभाळावी लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाची निवडणूक या वर्षी सप्टेंबर महिन्यात होऊ शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List