महाराष्ट्र सरकार हाय हाय, निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कोर्टाबाहेर घोषणा; कासलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

महाराष्ट्र सरकार हाय हाय, निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कोर्टाबाहेर घोषणा; कासलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असणारे निलंबित उपनिरीक्षक रणजित कसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी कासलेला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला आज मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी कासलेला कोर्टाबाहेर आणले असता त्याने ‘महाराष्ट्र सरकार हाय हाय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, अशा घोष दिल्या.

दरम्यान, गेल्या महिन्यात भांडुप येथील एका कार्यकर्त्याने कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कासलेविरोधात गुन्हा नोंद केला होता. तसेच कासलेने नुकतेच सोशल मीडियावर राजकीय नेत्यावर टिप्पणीदेखील केली होती. जातीय द्वेष पसरवणे, अधिकाऱ्याची बदनामी करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्याच्या आरोपाखाली कासलेला दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;