ATS चा भिवंडीतील बोरीवली गावात छापा; साकिब नाचणच्याही घराची तपासणी, पोलीस बंदोबस्त तैनात

ATS चा भिवंडीतील बोरीवली गावात छापा; साकिब नाचणच्याही घराची तपासणी, पोलीस बंदोबस्त तैनात

भिवंडीतील बोरीवली गावात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) सोमवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत कुख्यात दहशतवादी साकिब नाचनच्या घराचीही तपासणी करण्यात येत आहे. एटीएसच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावात एटीएसचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या एटीएसची अनेक पथके पहाटेपासून अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी जाऊन छापेमारी करत आहे. यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे. महाराष्ट्रात एटीएसकडून इसिसशी संबंधित कथित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. यात भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात सोमवारी पहाटेपासून एटीएसने छापा टाकला आहे.

एटीएसकडून सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान 8 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. तसेच साकिब नाचणच्या घराची तपासणी करण्यात आल्याचे समजत आहे.  गावात ठाणे ग्रामीण, रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

बोरिवली गाव हे साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखलं जातं. यापूर्वीही या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवाईंमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 16 जणांना अटक करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;