कोरेगावातील कचरा डेपोप्रकरणी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कोरेगावातील कचरा डेपोप्रकरणी शेतकरी आक्रमक; शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीररीत्या उभारलेल्या कचरा डेपोमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असून, शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सातत्याने पुराव्यानिशी तक्रारी करूनदेखील महसूल, जनसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दिला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेऊन निवेदन सादर करत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. कचरा डेपो बंद न झाल्यास तीव्र कोणत्याही परिस्थितीत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मधुकर जाधव यांच्यासह शेतकरी आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांची शाब्दिक चकमक उडाली.

कोरेगाव नगरपंचायतीने शहरानजीक जलसंपदा विभागाच्या पोटपाटालगत अनधिकृतरीत्या कचरा डेपो उभारला आहे. नियमबाह्य पद्धतीने मुख्याधिकारी विनोद जळक यांनी अनधिकृत कचरा डेपो सुरू केला असून, त्याचा त्रास परिसरातील लोकांना होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी स्वतंत्ररीत्या गोळेवाडी गावच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून दिली आहे, असे असतानादेखील स्थानिक कार्यकर्त्यांना जगविण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने दरमहा भाडे रक्कम देऊन कचरा डेपो भाडय़ाच्या जागी सुरू केला आहे.

या संदर्भात यापूर्वी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. नगरपंचायत आणि मुख्याधिकारी हे पूर्णपणे दोषी दिसत असले, तरी प्रशासकीय अधिकारी या नात्याने आपण त्यांची पाठराखण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कोरेगावचे मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ यांनीदेखील कचरा डेपोचा पंचनामा करत असताना पारदर्शक पद्धत राबवली नाही तसेच नियमबाह्य पद्धतीने सुनावणी घेऊन जागामालकाला आणि नगरपंचायतीला फायदा होईल, असे वर्तन केले आहे, असे या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे. या निवेदनावर धनंजय बर्गे, विक्रमसिंह शिंदे, सयाजी बर्गे, प्रदीप बर्गे, सयाजीराव बर्गे, सचिन बर्गे, हरिदास माने, हरिदास काटे, गणेश काटे, शरद बर्गे, अभिजीत साळुंखे, प्रवीण साळुंखे, राजेंद्र साळुंखे, सुरेश बर्गे, सचिन बर्गे, चंद्रकांत बर्गे, अनिल बर्गे, सचिन साळुंखे, शुभम माने यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;