जेवणासाठी गेला अन् विमान कोसळताच हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; विद्यार्थ्याच्या आईने सांगितला थरारक घटनाक्रम

जेवणासाठी गेला अन् विमान कोसळताच हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी; विद्यार्थ्याच्या आईने सांगितला थरारक घटनाक्रम

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे ‘बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान लंडन दिशेने निघाले आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. हे प्रवासी विमान अवघ्या 32 सेकंदात रहिवासी भागात कोसळले आणि भयंकर स्फोट होऊन विमानाची राखरांगोळी झाली. यात विमानातील 241 प्रवाशांसह 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघातामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

काहींची कुटुंबियांना भेटण्याची ओढ, तर काहींची फिरण्याची, शिक्षणाची स्वप्न, तर काहींचे कायमचा लंडनला स्थायिक होण्याचे स्वप्न अवघ्या काही सेकंदातच नष्ट झाली. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अत्यंत भीषण विमान दुर्घटना असून अवघा देश सुन्न झाला आहे. मात्र नशिबाच्या साथीने या अपघाचात काही जणांचा जीव वाचला. यापैकीच एक म्हणजे ज्या मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या वसतिगृहावर हे विमान आदळले त्या वसतीगृहातील एक विद्यार्थी.

मिळालेल्या माहितीनुसार, रमीला नावाच्या एका महिलेने तिच्या मुलाचा थरारक अनुभव सांगितला. रमीलाचा मुलगा अहमदाबादधील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचे वसतिगृहात राहतो. माझा मुलगा जेवणासाठी वसतिगृहात गेला होता, आणि याचवेळी हा अपघात झाला. ज्यावेळी मला या घटनेबाबत समजले तेव्हाच मला वाटलं होतं आता सगळचं संपल आहे. पण मी देवाचे आभार मानते कारण माझा मुलगा सुखरूप आहे, असे त्या म्हणाल्या.

रमीला पुढे म्हणाल्या की, जेव्हा हे विमान वसतिगृहावर आदळले त्याच क्षणी माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे तो जखमी झाला आहे. मी त्याच्यासोबत फोनवर बोलले आहे. तो म्हणाला मला मम्मी मी ठीक आहे, फक्त थोडसं लागलं आहे, असे त्याने मला फोनवर सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;