MAYDAY… MAYDAY… पायलटने पाठवला आपत्कालीन संदेश, कॅप्टन सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव

MAYDAY… MAYDAY… पायलटने पाठवला आपत्कालीन संदेश, कॅप्टन सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव

दुर्घटनाग्रस्त एआय 171 विमान 625 फूट उंचीवर होते. त्यानंतर ते क्षणातच खाली येऊ लागले. विमानात दोन पायलट आणि 10 केबिन क्रू होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे विमान उडवत होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर त्यांच्यासोबत होते. दोघे अनुभवी पायलट होते. विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. उड्डाण करताच पायलटने जवळच्या एटीसीला मेडे आपत्कालीन कॉल केला.

विमान 625 फूट उंचीवरून प्रति मिनिट 475 फूट वेगाने खाली येऊ लागले. या स्थितीत वैमानिकांकडे उत्तर देण्यासाठी एक मिनिटाहूनही कमी वेळ होता. शेवटी विमान एक रहिवासी इमारतीवर आदळले आणि स्फोट होऊन कोसळले. मेडे कॉल हा कोणत्याही विमानातील आपत्कालीन संदेश असतो. विमान संकटात असताना आणि प्रवाशांच्या, क्रूच्या जिवाला धोका असताना पायलट मेडे कॉल करतो.

अनुभवी पायलट

सुमित सबरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्ह यांना 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. या दोघांचा एकत्रित उड्डाण अनुभव तब्बल 9,300 तासांचा असल्याची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने गुरुवारी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;