मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद सर्वांनी एकत्र यावे, ही उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे इच्छा – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येणार असल्याबाबतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले. कोणत्याही मुलाखतीमुळे चर्चा होत नाहीत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधू यांचे पडद्यामागे काय बोलणे होत आहे, ते महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी मुलाखत दिल्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या असे आपण मानत नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीवर कोणत्याही चर्चा ठरत नाही. आता मिंधे आणि फडणवीस समोरासमोर आल्यावर गोड बोलतात. एकमेकांशी चांगले वागतात. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही, हे दिसून येते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय सुरू आहे, ते आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यावर विश्वास ठेवतो, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांच्या एमएनएस पक्षाशी नाते जोडण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे, यापेक्षा ठाकरे पडद्यामागे काय बोलत आहे, हे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. या दोघांनी एकत्र यावे, ही जनतेची इच्छा आहे. तसेच दोघांवर जनतेचे प्रेम आहे. जनतेचा दबाबवही आहे. हा दबाव भावनिक आणि राजकीय आहे. मुंबईवर मराठी माणसाला हक्क कायम ठेवायचा असेल, ईस्ट इंडिया कंपनी सूरतपासून मुंबई वाचवायची असेल, तर मराठी माणसाला एकत्र यावेच लागेल, अशी जनभावना आहे. मराठी माणासासाठी सर्व मतभेद, सर्व किल्मिशे दूर ठेवत मराठी माणसाने एकत्र यावे, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक पावले टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठी माणसाचे अहित होत कामा नये, ही उद्धव ठाकरे यांनी मन से आणि दिल से भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
ईस्ट इंडिया कंपनीच्या दिल्लीत बसलेल्या मालकांची भूमिका आहे की, जोपर्यंत ठाकरे आणि पवार ब्रँड संपत नाही, तोपर्यंत त्यांना मुंबईसह महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही. मुंबई ही आर्थि राजधानी आणि महाराष्ट्रासारखे राज्या गिळण्यासाठी ठाकरे आणि पवार यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतले, महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. मात्र, त्यांना ठाकरे आणि पवार ब्रँड संपवता आला नाही. अजूनही जनता ठाकरे आणि पवार यांच्यासोबत आहे. मोदी, शहा, फडणवीस यांचे देशासाठी, राज्यासाठी काहीही योगदान नाही. त्यामुळे त्यांची नावे विस्मृतीत जातील. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची नाव कायम स्मरणात राहतील, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List