Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून

Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून

प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन जीवलग मित्रानेच मित्राचा दगडाच्या खाणीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीस अपघात झाल्याचे वाटत असतानाच, संशयातून पोलिसांनी केलेल्या तपासात एका मुलीवरील प्रेमातूनच खुनाचा हा प्रकार समोर आला.

महेंद्र प्रशांत कुंभार (वय – 18, रा. केर्ले, ता. करवीर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, खुनाची कबुली दिलेल्या संशयित अल्पवयीन मित्राची न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील केर्ले गावात महेंद्र आणि अल्पवयीन संशयित आरोपी हे दोघे लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते. महेंद्रचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच मुलीवर संशयित आरोपीचेही एकतर्फी प्रेम होते. महेंद्र आणि ती मुलगी एकमेकांशी बोलतात, भेटतात आणि फिरत असल्याचा राग संशयित आरोपीच्या मनात होता. यावरूनच दोन्ही मित्रांमध्ये फेब्रुवारी महिन्यात जोरदार भांडणदेखील झाले होते.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मित्राने महेंद्रला फोन करून दगडी खणीजवळ बोलावून घेतले. यावेळी दोघांमध्ये मुलीच्या विषयावरून पुन्हा वाद झाला. संशयिताने रागाच्या भरात महेंद्रचा मोबाईल हिसकावून घेऊन फोडला तसेच दुचाकीची चावीदेखील फेकून दिली. शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीवर झाले आणि या झटापटीत संशयित आरोपीने महेंद्रला जोरदार धक्का देत 80 ते 90 फूट खोल खणीत ढकलून दिले.

Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा

दरम्यान, महेंद्र घरी न आल्याने नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. यावेळी महेंद्र बेशुद्धावस्थेत खणीत पडलेला सापडला. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती करवीर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तपास सुरू केला. कुटुंबीयांकडे चौकशी केली असता, मित्राचा फोन आल्यानंतर महेंद्र बाहेर पडला असल्याची माहिती त्यांनी दिली. महेंद्र आणि संशयित अल्पवयीन मुलाचे मोबाईल लोकेशन डिटेल्स एकच दाखवत होते. यावरून संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, अल्पवयीन आरोपीने खून केल्याची कबुली दिली. संशयित अल्पवयीन मुलाला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची 15 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;