हिंदुस्थानला शांतता हवी, पण दहशतवाद्यांना शिक्षा होणारच; शशी थरूर यांनी पाकिस्तानला सुनावले

हिंदुस्थानला शांतता हवी, पण दहशतवाद्यांना शिक्षा होणारच; शशी थरूर यांनी पाकिस्तानला सुनावले

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पनामा येथे विधानसभा अध्यक्ष डाना कास्टानेडा यांची भेट घेतली. यावेळी थरूर यांनी हिंदुस्थानची दहशतवादविरोधी ठाम भूमिकेची माहिती देताना पाकिस्तानवर कडाडून टीका केली. ते म्हणाले आहेत की, हिंदुस्थानला शांतता हवी, परंतु पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्याने हिंदुस्थानला कठोर पावले उचलावी लागत आहेत.

थरूर यांनी पनामाच्या विधानसभेत बोलताना 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले त्यांचे मुख्यालये उद्ध्वस्त केली. थरूर यांनी ठामपणे सांगितले की, हिंदुस्थानला युद्ध नकोय, पण दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय सोडता येणार नाही.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, थरूर म्हणाले की, “पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांना सतत प्रोत्साहन देत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर पाकिस्तानने कोणतीही कारवाई न केल्याने हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Srujan 2025 : सस्टेनेबल इकोसिस्टमच्या निर्मितीसाठी एक दिवसीय परिसंवाद Srujan 2025 : सस्टेनेबल इकोसिस्टमच्या निर्मितीसाठी एक दिवसीय परिसंवाद
शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘सृजन 2025’ या विषयावर आधारित एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन ‘First Sunday’ या संस्थेने केले...
Nanded News – पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू
मन:शांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरीत, विपश्यना केंद्रात दाखल झाल्याची चर्चा
IPL 2025 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नऊ वर्षानंतर फायनलमध्ये धडक,पंजाब किंग्जचा केला दणदणीत पराभव
पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस
आम्ही हल्ला करायच्या आधीच हिंदुस्थानने ब्रह्मोस मिसाईलने हल्ले केले, पाकिस्तानी पंतप्रधानांची कबूली
पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल