जैशचा म्होरक्या मसूद अजहरला 14 कोटींची भरपाई? पाकिस्तान सरकारची घोषणा
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला तब्बल 14 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे, असा दावा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैश ए मोहम्मदला दहशतवादी संघटना घोषित करत या संघटनेवर बंदी घातली होती. हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाला होता. हिंदुस्थानच्या कारवाईत पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. हे तळ पुन्हा बांधून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List