मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, संजय राऊत यांची टीका
संजय शिरसाट यांच्या मुलाने मूळ किंमतीपेक्षा कमी दरात 67 कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मिंधे गटाला शहा आणि फडणवीसांनी महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, दबावाचे विषय असतात. हे कौटुंबिक विषय असतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या नेत्यांनी पडू नये. कारण त्यासाठी महिला आयोग आहे महिला आघाड्या आहेत. त्यांनी त्याच्या विषयी बोललं पाहिजे. मी स्वतः कधी कुणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर शक्यतो बोलत नाही ते बोलू नये. संजय शिरसाट त्यांचे एक चिरंजीव आहे. त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे. या महाशयांनी संभाजीनगर मधलं एक वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड हॉटेल. अत्यल्प मूल्यावर त्यांनी ते आपल्याकडे ती संपूर्ण प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला आपल्या ताब्यात घेतली आणि जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी हे सिद्धांत शिरसाट आहे त्यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया राबवलेली. 67 कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी या महाशयांनी विकत घेतली. मेसर्स सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा अस त्या कंपनीच नाव आहे. मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रॉयव्हेट अँड सप्लाय या कंपनीने लिलावामध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आणि ती प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून मूळ किंमतीपेक्षा कमी पैशात म्हणून ही लिलाव प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीरपणे राबवण्यात आला. म्हणजे इतर जे टेंडर भरणारे लोक होते त्यांना विशिष्ट रक्कम अगदी कमी डिफरन्स दाखवण्यात आला. एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही, फार महान नाही, उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही पण 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये. कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहांनी दिले? अनेक गोष्टी आहेत. या महाराष्ट्रातली बेरोजगारांची संख्या पाहता म्हणजे मंत्र्यांची मुलं 100 कोटीच्या प्रॉपर्टी विकत घेतायत. प्रश्न असा आहे की हे पैसे आले अचानक आले कुठून. मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल लिकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टीस आहे. 67 कोटी रक्कम मोठी आहे. प्रॉपर्टीची मूळ किंमत त्यापेक्षा अनेक पट जास्त आहे. जी प्रॉपर्टी आहे त्याची किंमत खूप जास्त. अंबादास दानवे आमचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी या संदर्भातली सगळ्या प्रक्रियेमध्ये कसा घोटाळा झाला त्या संदर्भातल सविस्तर पत्र सरकारला लिहिलेल आहे. मी कालच अंबादास जाणवे यांच्याशी चर्चा केली. या महाराष्ट्रामध्ये मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय कशाप्रकारे लूट करतायत जनतेला कळू द्या. जनसेवेसाठी वगैरे, माननीय बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी पक्ष सोडला आणि आमची शिवसेना खरी हे जे काही सांगतायत ती खरी का तर अमित शहांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना महाराष्ट्र लूटीचा परवाना दिलेला आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच हे एकाच ताटामधलं सगळं प्रकरण आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा काय स्वतंत्र पक्ष नाही, तो अमित शहांचाच पक्ष. जसं एका कंपनीमध्ये काही सिस्टर कन्सर्न असतात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये. त्या दृष्टीने मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमित शहांनी केलेली रचना आहे. महाराष्ट्रातला सगळा लुटीचा मार्ग हा एकाच वन विंडो सिस्टीम एका ठिकाणी यावा म्हणून एक कंपनी एकनाथ शिंदेची अजित पवार यांची एक कंपनी. या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत. भाजपा मुख्य कंपनी आहे आणि बाकी या दोन सबसिडरी कंपनी आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या शेअर बाजारमध्ये नवीन कंपन्या टाकल्या त्या आता अमित शहा यांच्या कंपन्या आहेत मालकी हक्क अमित शहाकडे आहे. एकनाथ शिंदे प्रायव्हेट लिमिटेड आणि अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपन्या आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List