अमिताभ बच्चन यांचा 49 वर्ष जुना बंगला, आईच्या निधनानंतर का लागला टाळा?
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या – वईट घटना घडल्या. पण आज बिग बी यांच्याकडे कोणती गोष्ट नाही… असं काहीच नाही. मुंबईत बच्चन कुटुंबाची फार मोठी प्रॉपटी आहे. त्यामधील एक म्हणजे बिग बी यांचा जुहू येथील बंगला. या बंगल्याचं नाव प्रतिक्षा बंगला असं आहे. या बंगल्यात बिग बींच्या असंख्य आठवणी कैद आहेत.
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनीच बंगल्याचं नाव प्रतिक्षा ठेवलं होतं. जेथे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांचं स्वागत केलं. ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न देखील प्रतिक्षा बंगल्यात झालं आणि त्याच बंगल्यात ऐश्वर्या सून म्हणून आली. या बंगल्याचा इतिहास देखील फार जुना आहे.
1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ सिनेमाच्या यशानंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी बंगली खरेदी केला. तेव्हा दोघांच्या लग्नाला देखील तीन वर्ष झाली होती. ‘कोन बनेगा करोडपती’ मध्ये एकदा अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘अनेकांनी मला विचारलं की, बंगल्याचं नाव प्रतीक्षा का ठेवलं आहे? मी माझ्या वडीलांना विचारलं होतं प्रतिक्षा नाव का?’
यावर हरिवंश राय बच्चन म्हणाले होते, ‘स्वागत सबके लिए है पर नहीं हैं किसी के लिए प्रतीक्षा…’ म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतो. पण कोणत्याच गोष्टीसाठी प्रतिक्षा करु शकत नाही.. महत्त्वाचं म्हणजे आराध्या बच्चन हिचा जन्म झाल्यानंतर देखील प्रतिक्षा बंगल्यात आणलं होतं. आराध्याला दिवंगत पणजोबा आणि पणजी यांना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रतिक्षा बंगल्यात आणलं होतं.
आई-वडिलांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब जलसा येथे स्थलांतरित झालं. 2007 मध्ये आईच्या निधनानंतर, हा बंगला बंद करण्यात आला आणि दोन दशके तो बंदच राहिला. त्याने बंगला जसा होता तसाच ठेवला आहे. या बंगल्यात अमिताभ बच्चन यांमी त्यांच्या पालकांच्या आठवणी जपल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List