नालासोपाऱ्यात नशेचा ‘उडता पंजाब’; एमडी, ब्राऊन शुगर, गांजा सप्लायचा अड्डा

नालासोपाऱ्यात नशेचा ‘उडता पंजाब’; एमडी, ब्राऊन शुगर, गांजा सप्लायचा अड्डा

>> मनीष म्हात्रे

नालासोपारा शहर आता एमडी, ब्राऊन शुगर, गांजा सप्लायचा अड्डा झाला असून शहराची वाटचाल नशेचा ‘उडता पंजाब’च्या मार्गाने सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मेफेड्रिन ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून दोन दिवस उलटले नाही तोच नालासोपाला आणि तुळींज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून 1 कोटी 66 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. अमली पदार्थांचा गोरखधंदा चालवणाऱ्या अबेके व्हिक्ट्री, शिवा स्वामी, झाकीर अन्सारी यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

नालासोपाऱ्यात नायजेरियन महिलेच्या ताब्यातून साडेपाच कोटींचे एमडी जप्त करण्यात आले होते. ही कारवाई चर्चेत असताना पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई असून करोडोंचा मुद्देमाल हस्तगत केला. तुळींज पोलिसांनी यशवंत हाईटजवळील भाजी मार्केट रोडवर संशयास्पद फिरणाऱ्या अबेके व्हिक्ट्री या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता पोलिसांना 1 कोटी 60 लाखांचे एमडी हा अमली पदार्थ आढळला. तर दुसऱ्या घटनेत पाणी विक्रेत्याकडून साडेसहा लाखांचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आहे.

पाणी विक्रीचा व्यवसाय करणारा तरुण अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शिवा स्वामी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 32 हजारांची ब्राऊन शुगर जप्त केली. जामा मस्जिद येथील करारी मिल कंपाऊंडजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या झाकीर अन्सारीला नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 32 हजारांचा गांजा जप्त केला.

नायजेरियनची वस्ती
नालासोपारा प्रगतीनगर परिसरात नायजेरियन लोक अनधिकृतपणे बार चालवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. शहरातील आचोळे अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवाल नगर, गाव, प्रगतीनगर, रेहमतनगर तर पश्चिमेकडील हनुमाननगर या परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियनची वस्ती आढळते. तर तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात बोटावर मोजण्याइतक्याच नायजेरियची नोंद आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;