मैं झुकेगा नहीं साला…पुष्पाच्या या जगप्रसिद्ध डायलॉग मागे कोण? अल्लु अर्जुन याने सांगितले
साल २०२१ मध्ये ‘पुष्पा’ आणि साल २०२४ मध्ये ‘पुष्पा 2’द्वारे साऊथ सुपर स्टार अल्लु अर्जुन याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.त्याचा हा चित्रपट लोकांना इतका आवडला की दोन्ही पार्टमध्ये त्याचा ‘मैं झुकेगा नहीं साला…’ हा डायलॉग वर्ल्ड फेमस झाला. डेव्हीड वॉर्डर सह आणखीही काही परदेशी कलाकारांनाही या डायलॉगने भुरळ घातली. परंतू तुम्हाला हे माहिती आहे का या डायलॉगच्या क्रिएशनच्या मागे नेमके कोण आहे ? अल्लू अर्जुन याने स्वत: या संदर्भात मनमोकळे केले आहे.
1 ते 4 मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्ह्युजवल एंड एन्टरटेन्मंट समीटचे आयोजन केले होते. या समिटमध्ये बॉलीवूड पासून साऊथ पर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याने देखील यात सहभाग घेतला. इव्हेंटमध्ये अल्लु अर्जून याने टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी बातचीत केली. त्या दरम्यान जेव्हा अल्लु अर्जुन याला त्याच्या फेमस डायलॉग संदर्भात विचारले गेले. तेव्हा त्याने या क्रिएशनचे क्रेडिट फिल्मचे डायरेक्टर सुकुमार यांना दिले.
बरुण दास यांनी अल्लु अर्जुन याला विचारले की, मी माझ्या आयुष्यात अनेक आयकॉनिक डायलॉग ऐकले आहेत. उदाहरण… बिग बी अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आहे – ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता…’, ‘मैं जहां खड़ा होता हूं, लाइन वहीं से शुरू हती है…’ सनी देओल याचा डायलॉग ये ढाई किलो का हाथ..आता झुकेगा नही साला…हा कसा क्रिएट झाला …?
डायरेक्टर सुकुमार यांचे क्रिएशन
या प्रश्नावर अल्लु अर्जुन यांनी सांगितले,” हे आमचे डायरेक्टर सुकुमार यांचे योगदान आहे. संपूर्णपणे हे त्यांचेच क्रिएशन आहे. अल्लु अर्जुन याने यावेळी आपण स्क्रिप्टची निवड कशी करतो हे देखील सांगितले. तो म्हणाला की गट फिलिंग्स.. केवळ गट फिलिंग्स, सर्वात मोठा इंटेलिजन्स हाच आहे. जर तुम्हाला जर वाटतं की हे चांगलं आहे. तेव्हा शक्यता असते की ती तुम्हाला धोका देत नाही. या बाबत मी खूप लकी आहे.”
दूसरा सर्वात जादा कमाई करणारा ‘पुष्पा 2’
‘पुष्पा’ च्या दोन्ही पार्टना सुकुमार यांनी डायरेक्टशन दिले आहे. पहिला पार्टने वर्ल्डवाईड 350 कोटींहून अधिकची कमाई केली होती. दूसऱ्या पार्टने जगभरात 1850 कोटींहून जादा कमाई करुन इंडियन सिनेमाची दूसरी सर्वाधिक जादा कमाई करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List