उन्हाळ्यात Eiffel Tower ची उंची वाढते; पण कशी? वाचा सविस्तर…

उन्हाळ्यात Eiffel Tower ची उंची वाढते; पण कशी? वाचा सविस्तर…

पॅरिसच्या गुस्ताव आयफेल या इंजिनअरने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एका सुंदर टॉवरची बांधणी केली. या टॉवरला आयफेल टॉवर म्हणून ओळखल जातं. जगभारातून लाखो पर्यटक आवर्जून आयफेल टॉवरला भेट देतात. या टॉवरची उंची  324 मीटर एवढी आहे. मात्र, उन्हाळ्यात पॅरिसमधील आयफेल टॉवरची उंची वाढते.

उन्हाळ्यात हा टॉवर सुमारे 6 इंच किंवा 15 सेंटीमीटरने उंच होतो. उन्हाळ्यात या टॉवरचा आकार जसा वाढतो तसाच हिवाळ्यात त्याचा आकार कमी होतो. आयफेल टॉवर लोखंडापासून बनलेला आहे. अतिउष्णतेच्या संपर्कात आल्यावर धातूंचा विस्तार होतो. या प्रक्रियेला थर्मल एक्सपेंशन म्हणतात. जेव्हा जेव्हा तापमान वाढते तेव्हा घन, द्रव आणि वायुयुक्त पदार्थांचा विस्तार होतो. यामुळे, उन्हाळ्यात आयफेल टॉवरचा आकार वाढतो.

दरवर्षी लाखो लोक पॅरिसचा आयफेल टॉवर पाहण्यासाठी येतात. हा भव्य दिव्य Eiffel Tower बनवण्यासाठी सुमारे 800 दिवस लागले होते.या टॉवरमध्ये 18, 038 लोखंडी पार्ट्स आणि सुमारे 25 लाख खिळे आहेत.

Eiffel Tower

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;