कैलास मानसरोवर यात्रा यंदा खर्चिक, चीनने 20 हजारांपर्यंत शुल्क वाढवले

कैलास मानसरोवर यात्रा यंदा खर्चिक, चीनने 20 हजारांपर्यंत शुल्क वाढवले

येत्या 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात होणार आहे, परंतु मानसरोवर यात्रा या वर्षी भाविकांसाठी खर्चिक असणार आहे. चीनने त्यांच्या भूभागावरील कैलास यात्रेचे शुल्क वाढवले असून चीन प्रति यात्रेकरू 17 ते 20 हजार रुपयांपर्यंत जास्त शुल्क घेत आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. दोन मार्गांतून कैलास यात्रा केली जाते. पहिला मार्ग म्हणजे उत्तराखंडमधील लिपुलेख मार्ग आणि दुसरा सिक्कीममधील नाथुला पास. चीन सीमेपर्यंत पहिल्यांदाच दोन्ही मार्गांनी प्रवास गाड्यांमधून होईल. लिपुलेखमार्गे यात्रेसाठी प्रति व्यक्ती 1.84 लाख रुपये खर्च येईल, पण यापैकी 1100 डॉलर म्हणजेच सुमारे 95 हजार रुपये चीनची फी असेल. 2019 मध्ये 1.30 लाख रुपयांच्या खर्चात 900 डॉलर म्हणजे 77 हजार रुपये प्रति यात्रेकरू चीनने घेतले होते.

याआधी लिपुलेखमार्गे कैलास यात्रेसाठी 20 ते 21 दिवस लागत होते, परंतु आता 23 दिवस लागतील. याचे कारण म्हणजे प्रवाशांचे दिल्लीत 12 दिवस वास्तव्य असणार आहे, तर फक्त नऊ दिवस तिबेटमध्ये जाणार आहेत. पूर्वी दिल्लीत एका दिवसात कागदपत्रांची तपासणी केली जात होती. त्यानंतर पिथौरागडला पोहोचल्यावर धारचुला, पांगू, गुंजी येथे आरोग्य तपासणी होत असायची, परंतु 2025 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत तीन दिवस आरोग्य व कागदपत्र तपासणीसाठी ठेवले आहेत.

  • कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्यांसाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्टची वैधता किमान 6 महिने असावी. 1 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय किमान 18 ते 70 वर्षे असायला हवे.
  • अर्जदाराच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. प्रवासासाठी वैद्यकीय चाचणी सर्वात महत्त्वाची आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;