Mumbai Local Update- मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलची रेड्याला धडक, जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली
On
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंब्राच्या रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या कल्याण फास्ट लोकलची एका रेड्याला धडक बसली. फास्ट लोकल असल्यामुळे तिचा वेग जास्त होता. त्यामुळे या लोकलच्या धडकेत या रेड्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली आहे. तसेच हा ट्रॅक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक डाऊन धीम्या मार्गावार वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
20 May 2025 18:05:18
इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ते जून 2026...
Comment List