देशाशी गद्दारी मान्य नाही, आम्ही प्रश्न विचारणारच; काँग्रेसने मोदी सरकारला सुनावले

देशाशी गद्दारी मान्य नाही, आम्ही प्रश्न विचारणारच; काँग्रेसने मोदी सरकारला सुनावले

राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर भाजप स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आपण कसेही राजकारण करू आणि विरोधी पक्ष गप्प बसतील, असे त्यांना वाटते. आम्ही देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारणार नाहीत, असे त्यांना वाटते. मात्र, आम्हाला देशाशी गद्दारी मान्य नाही. आम्ही राष्ट्रीय हिताचे प्रश्न विचारत राहू आणि जर आम्ही प्रश्न विचारले नाहीत तर देशात दहशतवादी घटना घडतच राहतील, असे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटले आहे. पवन खेरा यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी जे केले ते पाप असल्याचा आरोप केला.

त्यांनी केलेले काम नसून पाप आहे. हे आजच घडत नाही तर वर्षानुवर्षे हेच घडत आहे. मोरारजी देसाई यांना जनसंघ यांचे सरकार असताना मोरारजी देसाई पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान जनरल झिया-उल-हक यांना फोन केला आणि सांगितले की कहूता येथील अणुप्रकल्पासाठी पाकिस्तानमध्ये काय तयारी सुरू आहे हे रॉच्या लोकांनी आम्हाला सांगितले आहे. या घटनेनंतर काही दिवसांनी, आपण RAW चे अनेक लोक गमावले. पाकिस्तानने त्यांना गायब केले, मारले, त्यांनी काय केले हे आम्हाला माहित नाही. मोरारजी देसाईंनी झिया यांना केलेल्या एका फोन कॉलमुळे RAW चे दशकांचे कठोर परिश्रम वाया गेले. मोरारजी देसाईंच्या या पापाची किंमत देश अजूनही चुकवत आहे, असे काँग्रेस खेरा म्हणाले.

मोरारजी देसाई यांच्याप्रमाणेच एस. जयशंकर यांनी जे केले ते पापाच्या श्रेणीत येते. या देशातील कोणत्याही परराष्ट्र मंत्र्यांनी, कोणत्याही सरकारने यापेक्षा मोठे पाप केलेले नाही, असे खोरा म्हणाले. आपल्या सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. अचानक डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी युद्धबंदीची घोषणा केली. याबाबत पंतप्रधान मोदी गप्प आहेत. आम्हाला देशाचा विश्वासघात मान्य नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आम्ही प्रश्न विचारणारच, असे खेरा म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Intelligence Bureau प्रमुख तपन डेका यांना मुदतवाढ, जून 2026 पर्यंत राहणार पदावर Intelligence Bureau प्रमुख तपन डेका यांना मुदतवाढ, जून 2026 पर्यंत राहणार पदावर
इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) प्रमुख तपन कुमार डेका यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ते जून 2026...
…जेव्हा जयंत नारळीकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग यांचा पराभव केला!
Hair Care- कंगवा की ब्रश, केसांसाठी काय उत्तम?
IPL 2025 – भाऊ सुधारणार कधी? आता अभिषेक शर्माला भिडला, BCCI ने ठोठावली शिक्षा
कोरोनाचा फटका? शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान
भाजप आणि महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची लेवल जनतेला समजली, संजय राऊत यांचा सणसणीत टोला
तुमच्या शरीरातील लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत वरदान