सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ

सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ

हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसह पूर्व आशियात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढत असून सिंगापूरमध्ये 1 मे ते 19 मेदरम्यान 3 हजार कोरोना रुग्ण आढळले. एप्रिलच्या अखेरीपर्यंत ही संख्या 11 हजार 100 होती त्यात 28 टक्क्यांची वाढ झाली असून सध्या येथील रुग्णांची संख्या 14 हजार 200वर गेली आहे. तर हाँगकाँगमध्ये चाचण्यांचे प्रमाण 12.66 टक्क्यांवर पोहोचले आहे.

सिंगापूरमध्ये नवा व्हेरियंट

सध्या सिंगापूरमध्ये एलएफ.7 आणि एनबी.1.8 या कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटचा प्रसार होत आहे. हे दोन्ही प्रकार जेएन.1 स्ट्रेनशी संबंधित असून त्यांनी दोन तृतीयांशहून अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत.

जेएन1 रोगप्रतिकार शक्ती कमी करतो

जेएन1 ओमिक्रॉनच्या बीए 2.86चा एक स्ट्रेन आहे. हा व्हेरियंट 2023मध्ये पहिल्यांदा आढळला होता. यात 30 म्युटेशन्स असून ते रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतात. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार जेएन1 आधीच्या कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो. परंतु, तो धोकादायक नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरियंटला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा
महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. राजभवनात आज झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन...
मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढला? 53 रुग्ण मिळताच महानगरपालिका प्रशासन अलर्ट
हवेशीर बाल्कनी, एक अख्खी भिंत अवॉर्ड्सने भरलेली; बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं नवं घर आतून फारच सुंदर, इंटेरिअर अगदीच खास
अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरोधात दाखल केला 25 कोटींचा खटला, काय आहे प्रकरण
मालिकेतल्या एका सीनसाठी मराठमोळी अभिनेत्री उतरली चिखलात; 3 तास राहिली दलदलीत
अमिताभ बच्चन यांचा 49 वर्ष जुना बंगला, आईच्या निधनानंतर का लागला टाळा?
स्तनांची स्वच्छता राखण्यासाठी या टिप्स फॉलो करा, संसर्गाचा कमी होईल धोका