पावसाळ्यात वर्किंग वुमनने कोणते ड्रेस परीधान करणे सर्वात बेस्ट असेल, वाचा सविस्तर
आपल्याकडे ऋतूबदलताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे पावसाळा सुरु होण्याच्या आधी काही गोष्टींचा विचार हा खूप गरजेचा असतो. खासकरुन कामावर जाणाऱ्या महिलांसाठी पावसाळा हा ऋतू परीक्षा पाहणारा असतो. त्यामुळेच ह्या सीझनमध्ये आॅफिसला जाण्यासाठी कोणत्या पद्धतीचे कपडे घालायला हवेत हा विचार आत्तापासूनच करणे गरजेचे आहे.
पावसाळा सर्वांनाच आवडतो. परंतु पावसाळी वातावरणात, कोणत्या प्रकारचे पोशाख घालायचे हे ठरवणे थोडे कठीण होते. हवामानाचा अधिक आनंद घेण्यासाठी, हलके, आरामदायी आणि लवकर कोरडे होणारे कपडे घालणे चांगले. पावसाळ्यात फ्लोरल, फ्लोई स्कर्ट हा सर्वोत्तम पर्याय असेल, परंतु मिनी आणि फ्लोअर लेंथऐवजी गुडघ्याच्या लांबीचे स्कर्ट निवडा.
ऑफिसमध्ये फ्लोरल प्रिंट्स अधिक गाॅडी दिसू शकतात. म्हणूनच आॅफिसला जाण्यासाठी कपडे निवडताना विचार करायला हवा. पावसाळ्यात आॅफिसला जाताना शक्यतो पटकन सुकतील असेच मटेरियलचे ड्रेस घालायला हवेत. म्हणजे कपडे भिजल्यावर किमान पटकन सुकण्यास मदत होते. पावसाळ्यासाठी हलके आणि चमकदार रंग उत्तम असतात. पिवळा, हिरवा, निळा आणि गुलाबी असे रंग खूप आकर्षक दिसतात.
तुम्ही फ्लोरल प्रिंट्स किंवा जाॅमेट्री प्रिंट सुंदर दिसतात. या डिझाइन्स आपल्याला न्यू लूक देतात. पावसाळ्यात कपड्यांची निवड करताना, ते कपडे लवकर सुकतील असेच असायला हवेत. पावसाळ्यामध्ये स्टायलिंग करतानाही खूप विचार करुन करायला हवे. कोणत्याही ड्रेससोबत कमीत कमी दागिने पावसाळ्यात घालणे हे हितावह आहे. कानातले छोटे टॉप किंवा एखादी चेन पुरेशी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List