“देशात हिंदू-मुस्लीमवरून वाद असताना मी अरबाजशी..”; बॉयफ्रेंडबद्दल नेमकं काय म्हणाली निक्की तांबोळी?
'बिग बॉस मराठी' फेम निक्की तांबोळी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. निक्की सध्या अरबाज पटेलला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलंय.
निक्की म्हणाली, "मी माझ्या भविष्याकडे खूप वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. मला मोठं कुटुंब आवडतं. मला एकत्र कुटुंबपद्धतीत राहायला आवडतं. मला लग्नही करायचंय आणि चार मुलांना जन्मही द्यायचा आहे. लोकांनी भरलेल्या कुटुंबात मला लग्न करायचं आहे."
त्या कुटुंबात माझे आई-वडील, मुलाचे आई-वडीलसुद्धा असावेत. मला असं कुटुंब आवडतं. मला स्वयंपाकाचीही खूप आवड आहे. तसंच मला बाहेर काम करायलाही आवडतं", असं ती पुढे म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List