IPL 2025 – भाऊ सुधारणार कधी? आता अभिषेक शर्माला भिडला, BCCI ने ठोठावली शिक्षा
IPL 2025 मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने दमदार फलंदाजी करत सहा विकेटने सामना आपल्या खिशात घातला. अभिषेक शर्माने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत 59 धावांची सलामी दिली. परंतु अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा एकदा नोटबूक सेलिब्रेशन केलं. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानातच वाद झाला होता.
अभिषेक शर्माची विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठीने नोटबूक सेलिब्रेशन करत एकप्रकारे अभिषेक शर्माला डिवचण्याचा प्रयत्न केला. दिग्वेश राठीच्या कृतीमुळे अभिषेक शर्माला राग आला आणि याचा जाब त्याने मैदानातच त्याला विचारला. यावेळी दोघही एकमेकांना भिडले. पंचांनी आणि खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांनाही दुर केलं. दिग्वेश राठीच्या या विचित्र सेलिब्रेशनमुळे त्याला याआगोदरही दंडीत करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा BCCI ने कारवाईचा बडगा उभारत त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली आहे. त्याचबरोबर मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिग्वेशचे पाच डिमेरिट पॉईंट झाले आहेत, त्यामुळेच त्याच्यावर एका सामन्याची बंदी लावण्यात आली आहे. लखनऊचा पुढचा सामना 22 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना दिग्वेशला तंबूत बसून पाहावा लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List