कर्मचाऱ्यांना काढून ‘एआय‘चा वापर करणे आमची चूक, स्वीडनच्या फिनटेक कंपनीची पश्चाताप व्यक्त करत कबुली
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्याजागी एआय टेक्नोलॉजीचा वापर करताना दिसत आहे, परंतु स्वीडनमधील फिनटेक कंपनी क्लार्नाला यांना उलट अनुभव आला आहे. कंपनीने काही वर्षांपूर्वी एआय मॉडेलचा वापर करण्यासाठी आपल्या कंपनीतील 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. मार्केटिंग आणि कस्टमर केअर नोकऱ्यांना ऑटोमेटिक करण्याचा निर्णय घेतला होता.
एआयचा वापर केल्यानंतर कंपनीची भरभराट होईल, काम सोपे होईल, असा कंपनीला विश्वास होता, परंतु एआय सेवेची गुणवत्ता घसरली. त्यामुळे कंपनीला नुकसान झाले. आधीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकून त्याजागी एआयचा वापर करणे ही कंपनीची घोडचूक होती, असे क्लार्ना कंपनीचे सीईओ सेबेस्टियन सिएमियातकोव्स्की यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता लवकरच एक मोठी भरती करणार आहे. 2023 मध्ये ओपनएआयचा अवलंब केल्यापासून कर्मचाऱ्यांची भरती बंद करण्यात आली होती.
सेवेची गुणवत्ता घसरली
मनुष्य जी कामे करतात, ती सर्व कामे एआय सहज करू शकतो, असे आम्हाला वाटत होते, परंतु आम्ही कंपनीसाठी नियुक्त केलेले एआय एजंट्स लोकांचा राग सहन करू शकले नाहीत. लोकांचा राग शांत करण्यात व्यक्तीच हवे आहेत. एआय रोबोटमुळे आमचे ग्राहक कंपनीवर नाराज झाले. ब्रँड आणि कंपनीच्या दृष्टीने ग्राहकांचा विश्वास जिंकणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु एआय या ठिकाणी कमी पडल्याचे आम्हाला दिसले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा कर्मचारी भरताचा निर्णय घेतला आहे, असे सीईओंनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List