India Pakistan Tensions – हरलेल्या जनरलचे पाकिस्तानने केले प्रमोशन, असीम मुनीरला बनवले फिल्ड मार्शल

India Pakistan Tensions – हरलेल्या जनरलचे पाकिस्तानने केले प्रमोशन, असीम मुनीरला बनवले फिल्ड मार्शल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या आत घुसून हिंदुस्थानी सैन्याने कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली. पण हिंदुस्थानच्या या सैन्य कारवाईनंतरही पाकड्यांची शेपूट वाकडीच आहे. हिंदुस्थानवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानने लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरचे प्रमोशन केले आहे. मुनीरला फिल्ड मार्शल बनवले आहे.

Operation Sindoor – पाकिस्तानचा कबुलनामा! हिंदुस्थानच्या कारवाईत पाकचे 11 सैनिक ठार, 78 जखमी; हवाई दलाच्या 5 अधिकाऱ्यांचा समावेश

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुनीरच्या प्रमोशनचा निर्णय घेण्यात आला. ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवसह पाकची हवाई तळंही उद्ध्वस्त केली. त्याचे पुरावेही हिंदुस्थानच्या सैन्याने दिले. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख म्हणून जनरल असीम मुनीरचा कार्यकाळ बघितल्यास मुनीर पूर्णपणे अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही पाकिस्तानने मुनीरचे प्रमोशन केले आहे. असीम मुनीरसह एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांचाही कार्यकाळ वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक?

जनरल अयूब खाननंतर असीम मुनीर हा पाकिस्तानचा दुसरा फिल्ड मार्शल झाला आहे. असीम मुनीरच्या प्रमोशनला पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तर जनरल अयुब खाने स्वतःला फिल्ड मार्शल घोषित केले होते. जनरल सय्यद असीम मुनीर हा 2022 पासून पाक सैन्याचा प्रमुख आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याचा तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून तो पाच वर्षांचा करण्यात आला होता. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख होण्यापूर्वी असीम मुनीर हा पाकची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना
आयपीएलमधून बाहेर फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी...
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान