…जेव्हा जयंत नारळीकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग यांचा पराभव केला!
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे मंगळवारी (20 मे 2025) पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. आपल्या 86 वर्षांच्या जीवनप्रवासात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा जोरदार डंका वाजवला. मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठी प्रचलित असलेल्या जयंत नारळीकरांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. या काळात केंब्रिज विद्यापीठामध्ये जगातले सर्वात श्रेष्ठ वैज्ञानिक स्टिफ हॉकिंग सुद्धा शिक्षण घेत होते.
जयंत नारळीकरांनी एका मुलाखतीमध्ये केंब्रिज विद्यापीठातील आठवणींना उजाळा दिला होता. जयंत नारळीकर आणि स्टिफन हॉकिंग केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकत असताना रॉयल ग्रीनवीच वेधशाळेने उन्हाळी सुट्टीमध्ये टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जयंत नारळीकरांची लढत स्टिफन हॉकिंग यांच्यासोबत रंगली होती. या सामन्यात जयंत नारळीकरांनी स्टिफन हॉकिंग यांचा पराभव केला होता. ही आठवण सांगत असताना जयंत नारळीकरांनी स्टिफन हॉकिंग यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं.
जयंत नारळीकरांना सरकारतर्फे कोण कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते?
वयाच्या विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे स्टिफन हॉकिंग यांचा मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेला होता आणि त्यांना बोलताही येत नव्हतं. अशा अवस्थेत ते जगले आणि आपल्या अफाट बुद्धीच्या जोरावर विश्वरचना शास्त्रातील कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. 14 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List