हिंदुस्थानातही कोरोनाचा प्रवेश; केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण, केंद्राकडून सतर्कतेची सूचना
हाँगकाँग, सिंगापूर, चीन आणि थायलंडनंतर आता हिंदुस्थानातही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामुळे केंद्राने अलर्ट जारी केला आहे. आशियामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे JN1 प्रकाराची आहेत. हिंदुस्थानात 19 मेपर्यंत कोरोनाचे 257 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थानसोबतच इतर देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 12 मेपर्यंत देशात 164 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 69 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे. देशात सर्वाधिक प्रकरणे केरळमध्ये नोंदली गेली आहेत. महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडूमध्ये 34 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कर्नाटकमध्ये 8 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. गुजरातमध्ये 6 आणि दिल्लीमध्ये 3 प्रकरणे नोंदली गेली. हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये एक नवीन रुग्ण आढळला. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की केरळमध्ये 95 सक्रिय प्रकरणे आहेत.
हिंदुस्थानप्रमाणे इतर देशातही कोरोना पसरत आहे. 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये 31 प्रकरणे नोंदवली गेली. सिंगापूरमध्ये 27 एप्रिल ते 3 मे या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 14,200 होती. गेल्या आठवड्यात 11,100 प्रकरणे नोंदवण्यात आली. कोरोनाच्या JN1 प्रकारामुळे आता रुगणसंख्या वाढत आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉन BA.2.86 प्रकारचा आहे. JN1 प्रकारात सुमारे 30 उत्परिवर्तने आहेत आणि त्यापैकी LF.7 आणि NB.1.8 आहेत. आता आढळणाऱ्या रुग्णांमध्ये याप्रकाराचे व्हरिएंट आढळत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List