वसई-विरारला मिळणार आता धो धो पाणी; देहरजी प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण

वसई-विरारला मिळणार आता धो धो पाणी; देहरजी प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पालघर विक्रमगडजवळ बांधण्यात येत असलेल्या देहरजी धरण प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता वसई-विरारकरांना धो धो पाणी मिळणार आहे. 2027 पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत आहे. धरणाची साठवण क्षमता 95.60 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी 93.22 दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे धरण आता 80 टक्के पूर्ण झाले असून धरणातून वसई-विरार महानगरपालिकेला 190 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी 15 एमएलडी आणि सिडको पालघर क्षेत्रासाठी 50 एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

धरणाचा खर्च 2 हजार 599 कोटी
कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे देहरजी प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येत आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी 2599.15 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत राबवण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याच्या वापरासाठी व्यापक पाणीपुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय? भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?
लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं...
IMD Weather Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, आयएमडीचा रेड अर्लट
ममता कुलकर्णीनंतर ही स्टार अभिनेत्री साध्वी बनणार? इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? आरोग्यास मिळतील दुप्पट फायदे
देशातील किती टक्के लोकांना पतंजलीची दंत कांती पसंत आहे?; 89 टक्के लोकांनी काय उत्तर दिलं?
पॅकेटमधील दूध कसे प्यावे उकळून की कच्चे? फायदेशीर काय?
Photo – तू हुस्न परी…