ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापक अली खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापक अली खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हरियाणातील सोनीपत जिल्हा न्यायालयाने अशोका विद्यापीठातील राजकीय शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अली खान महमूदाबाद याला ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवले आहे. हरियाणा पोलिसांनी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मुदतीनंतर त्याला आज न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने महमूदाबाद याला 27 मे पर्यंत न्यायिक कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावला आहे.

प्रकरण काय आहे?

अली खान महमूदाबाद याला 18 मे रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर ऑपरेशन सिंदूर या जम्मू-काश्मीरमधील लष्करी कारवाईसंदर्भात केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्याने ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेत सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या महिला अधिकाऱ्यांबाबत टिप्पणी केली होती, जी हरियाणा राज्य महिला आयोगाने लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणारी आणि सांप्रदायिक असंतोष पसरवणारी असल्याचं म्हटलं होतं.

महमूदाबाद याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 152 (देशाची सार्वभौमता, एकता आणि अखंडता धोक्यात आणणे), कलम 196 (सांप्रदायिक तेढ वाढवणे), आणि इतर गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना IPL 2025 – चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव, राजस्थानने 6 विकेटने जिंकला सामना
आयपीएलमधून बाहेर फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी...
सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक
मान्सूनबाबत आनंदाची बातमी; जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज काय?
Mumbai rain : पहिल्याच पावसाने मुंबई लोकलला फटका आणि उपनगरात दाणादाण, कोकण रेल्वे मार्गावर झाड कोसळले
संजय राऊतांचा संपादकीय बॉम्ब, भुजबळांच्या मंत्रि‍पदावर चार शब्दांचं ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
आंबेगाव तालुक्यात पावसाने थैमान, महाळूंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान