गोविंदा खोटारडे, त्यांच्याशी कधीच मैत्री होऊ शकत नाही; राम नाईक यांनी साधला निशाणा

गोविंदा खोटारडे, त्यांच्याशी कधीच मैत्री होऊ शकत नाही; राम नाईक यांनी साधला निशाणा

अभिनेता गोविंदा याने दोन दिवसांपूर्वी मिंधे गटात प्रवेश केला. त्याने मिंधे गटात प्रवेश करताच 2014 साली मिंधेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपचे नेते राम नाईक यांनी गोविंदावर केलेल्या आरोपांच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. राम नाईक यांनी 2014 मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या गोविंदावर त्याचे दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. दरम्यान गोविंदाच्या मिंधे गटातील प्रवेशानंतर राम नाईक यांनी पुन्हा प्रसारमाध्यमासमोर येत गोविंदावर निशाणा साधला आहे.

”मी गोविंदा यांना चांगलाच ओळखून आहे. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून मला हरवले होते. त्यांच्याशी मैत्रीाचा कधी होऊच शकत नाही. गोविंदा खोटारडे आहेत. त्यांनी याआधी दोन ते तीन वेळा आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. त्यांनी राजकारणात कधीच परतणार नाही असे सांगितलेले. मात्र आता ते परत आले आहेत, असा टोला राम नाईक यांनी गोविंदाला लगावला.

दाऊदवाल्या वक्तव्यावर कायम

”गोविंदा यांनी निवडणूकीत दाऊदची मदत घेतल्याच्या माझ्या आरोपावर मी कायम आहे. कुणी कधीच माझ्या त्या आरोपांवर आक्षेप घेतला नाही. माझ्या पुस्तकातही मी त्या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात ते आठ वर्ष झाली मात्र इतक्या वर्षात काहीही झालेले नाही, असे राम नाईक यांनी सांगितले. टीव्ही 9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भाजपची प्रतिक्रीया बघण्यासारखी – संजय राऊत

गोविंदाच्या मिंधे गटातील एन्ट्रीवरूनही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ”गोविंदा जेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढत होता तेव्हा भाजपचे उमेदवारी राम नाईक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्याच गोविंदाने भाजपच्या मित्र गटात प्रवेश केलाय. बघू आता यावर भाजपची काय प्रतिक्रीया असेल, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन कोटींची जमीन घेतली अन् ५० कोटीला विकली…संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट दोन कोटींची जमीन घेतली अन् ५० कोटीला विकली…संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा...
पोलीस भरतीसाठी मोठी अडचण, या नव्या अटीमुळे उमेदवारांचे होणार नुकसान
Mumbai hoarding collapse : होर्डिंग दुर्घटनेत लोकांचा जीव गेला, त्या दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेत्यांमध्ये भांडण, Video
एकाच वादळी पावसाने मुंबईची दुर्दशा, रेल्वेने मान टाकली, हवामान खाते म्हणते, अलर्ट दिला होतो…
Mumbai hoarding collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, बचाव कार्याची स्थिती काय? VIDEO
Mumbai Hoarding Collapse : ‘नशीब आले धावून, पण माझ्यासमोर तर कित्येक जण दबले’, 120 फूट उंच होर्डिंग पडल्यानंतर वाचलेल्या व्यक्तीने सांगितला तो थरारक क्षण
सलमान खानला माफ करू शकतो बिष्णोई समाज; पण ठेवली एक मोठी अट