बोगस मतदारांचा सुळसुळाट; ईव्हीएम अनेक ठिकाणी बंद, चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 59.64

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या. मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडाला तर काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार उघडकीस आले आहेत. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 59.64 टक्के मतदान झाले, तर देशभरात 96 मतदारसंघांमध्ये सरासरी 64.05 टक्के मतदान झाले.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या 11 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी पुणे जिह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे शहर लोकसभा मतारसंघातील काही मतदान पेंद्रावर बिघाड झाल्याने मतदान खोळंबले होते. छत्रपती संभाजीनगर, बीड लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होताना करण्यात येणाऱया मॉक ड्रिलच्यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले.

बीडमध्ये मतदानावर बहिष्कार

बीड जिह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासह इतर सुविधांच्या कारणावरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यामुळे आज मतदानाच्या दिवशी येथे शुकशुकाट होता.

रावेरमध्ये 4 तास वीजपुरवठा खंडित

जळगावच्या रावेरमध्ये विवरे बुद्रुक येथील मतदान पेंद्रावर 4 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने निवडणूक विभागाच्या कर्मचाऱयांनी टॉर्च लावून मतदानाची प्रक्रिया सुरू ठेवली.
कलाकारांनाही नाव वगळल्याने मनस्ताप

गायिका सावनी रवींद्र मतदानासाठी पेंद्रावर गेली असता, तिचे मतदारयादीत नावच नव्हते. याबाबत सावनीने पोस्टमध्ये म्हटले, ‘ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करीत आहे, त्याच ठिकाणी आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावे आहेत; पण माझे नाही. याबद्दल स्वतŠ व्होटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन ‘एईडी’ पर्यायाने व्होट करू शकते का? याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले.’ सावनीसारखाच अनुभव अभिनेता सुयश टिळक यालादेखील आला आहे.

शिरुरमध्ये बोगस मतदान उघडकीस

राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान पेंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या नावे बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचं निदर्शनास आले.

राज्यातील मतदान टक्केवारी
मतदारसंघ 2019 2024
नंदुरबार 68.65 67.12
जळगाव 56.55 53.65
रावेर 61.77 61.36
नगर 64.79 62.76
शिर्डी 64.93 61.13
पुणे 49.89 51.25
शिरुर 59.44 51.46
मावळ 59.59 52.90
संभाजीनगर 63.55 60.73
बीड 66.17 69.74
जालना 64.75 68.30

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;