बालवाटिका… पूर्व प्राथमिकच्या वर्गांचे बारसे झाले; जूनपासून अंगणवाडय़ांसाठी नवीन अभ्यासक्रम

बालवाटिका… पूर्व प्राथमिकच्या वर्गांचे बारसे झाले; जूनपासून अंगणवाडय़ांसाठी नवीन अभ्यासक्रम

शालेय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी)अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यानुसार पूर्व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2024 तयार करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जूनपासून सरकारी अंगणवाडय़ासाठी शालेय शिक्षण विभागाने तयार केलेला नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच यापुढे पूर्व प्राथमिकच्या वर्गाना बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 असे संबोधण्यात येणार आहे.

पूर्व प्राथमिक शालांसाठीचा नवीन अभ्यासक्रम विविध प्रकारच्या साहित्य, खेळ आदींवर आधारीत असेल, तर पहिलीपासून पुढे या अभ्यासक्रमांची पुस्तके असतील.

बालवाटिकेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अभ्यासक्रम आराखडा तयार करून देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर बालभारतीकडे यासाठीचे साहित्य तयार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या बालवाटिकासाठीचा अभ्यासक्रम तयार आहे. पहिली आणि दुसरीची नवीन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके अद्याप तयार नसल्याने जूनपासून या वर्गाना नवीन अभ्यासक्रम लागू होण्याची शक्यता कमी आहे.

z पूर्व प्राथमिकच्या बालवाटिका 1,2,3 आणि पहिली आणि दुसरीपर्यंत 3 ते 8 वर्षे वयोगटासाठी पहिल्या टप्प्यात नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.

z बालवाटीकेच्या शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका आणि विद्यार्थी कृती पुस्तिका असतील. z पहिली व दुसरीसाठी भाषा (मराठी, इंग्रजी), गणित, कार्यशिक्षण, कलाशिक्षण, शारिरीक शिक्षण हे विषय. भाषा व गणित विषयातच परिसर अभ्यास असेल. z पूर्व प्राथमिक स्तरावर बोलीभाषेचा वापर. z अभ्यासासोबतच संगीत, कला आणि कार्यानुभव. z मैदानी आणि वर्गातील खेळ, क्षेत्र भेटी, प्रकल्पाधारित अध्ययन, जोडी आणि गट संभाषण, तंत्रज्ञान आधारित अध्ययन, निसर्ग सहली, बाल मेळावे त्यासोबतच सण, उत्सव, विशेष दिन ,समारंभ आदींचा अभ्यासक्रमात समावेश.

शालेय स्तरावर चालू घडामोडी, जगासमोरील गंभीर समस्यांवर भर

नव्या अभ्यासक्रमात हिंदुस्थानी ज्ञान प्रणाली, डिजिटल साक्षरता, संगणकीय विचार, देशाचे ज्ञान, चालू घडामोडी, जगासमोरील गंभीर समस्या या सर्व विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तसेच घोपंपट्टीऐवजी चिकित्सक आणि विश्लेषणात्मक विचारांवर भर देण्यात आला आहे. शालेय पातळीवरच विद्यार्थी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करतील याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यायचे आहे. विद्यार्थ्यांमधील निर्णय क्षमता, समस्या सोडविणे, निर्णायक विचार करणे याल प्रोत्साहन देऊन समान संधी, इतरांबद्दल आदर, स्वच्छता, लोकशाहीची भावना, सेवाभाव, सार्वजनिक मालमत्तेचा आदर, विज्ञानात रस ही मूल्येही विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;