Mumbai hoarding collapse : होर्डिंग दुर्घटनेत लोकांचा जीव गेला, त्या दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेत्यांमध्ये भांडण, Video

Mumbai hoarding collapse : होर्डिंग दुर्घटनेत लोकांचा जीव गेला, त्या दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेत्यांमध्ये भांडण, Video

घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली. एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. लोखंडी आणि स्टीलचे रॉड असलेल्या या होर्डिंगखाली अख्खा पेट्रोल पंप दबला गेला. पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 लोक या पेट्रोल पंपाखाली दबले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग खाली अडकलेल्या 74 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. काही जखमींवर जवळच्या राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहिल्याच बेमोसमी पावसाने मुंबईमध्ये मोठ नुकसान झालं. एक मोठी दुर्घटना घडली. निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले.

घाटकोपर येथे दुर्घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि NDRF चे जवान अजूनही बचाव कार्यात गुंतले आहेत. प्रशासन आपल्यापरीने जीव वाचण्याचे सर्व प्रयत्न करतय. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भांडत असल्याच चित्र दिसलं. भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील सुद्धा तिथे होते. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा उत्तर-पूर्व लोकसभा म्हणजे ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवत आहेत.

‘कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेला होता का?’

मविआ नेते संजय दीना पाटील यांनी किरीट सोमय्यांवर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्याने संजय दीना पाटील भडकले. “भाजपा नेते बचाव कार्यात अडथळे आणत आहेत. सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवून ठेवलं होतं” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. “खोट बोलतायत, ते उल्लू बनवत आहेत. खोटं बोलण यांचं काम आहे. ते का आत गेले? प्रशासनाच्या कामात अडथळे आणतात” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. ‘कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले होते का?’ असा सवाल संजय दीना पाटील यांनी विचारला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;