भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन

भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. गेला काही काळ ते कर्करोगाशी झुंजत होते. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोदी यांच्या निधनाची माहिती दिली असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गेले सहा महिने सुशील कुमार मोदी हे कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती 3 एप्रिल रोजी दिली होती. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1952 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मोतीलाल मोदी होतं. त्यांच्या पश्चात पत्नी जेस्सी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सुशील कुमार मोदी यांनी पाटणा येथील विज्ञान महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. 1990मध्ये ते सर्वप्रथम बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1995 आणि 2000 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;