तारीख पे तारीख! म्हाडाच्या 17 भूखंडांचा लिलाव चौथ्यांदा लांबणीवर, इच्छुकांना 25 मेपर्यंत निविदा सादर करता येणार

तारीख पे तारीख! म्हाडाच्या 17 भूखंडांचा लिलाव चौथ्यांदा लांबणीवर, इच्छुकांना 25 मेपर्यंत निविदा सादर करता येणार

म्हाडाच्या मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 17 भूखंडांचा लिलाव चौथ्यांदा लांबणीवर पडला आहे. इच्छुकांना आता 25 मेपर्यंत निविदा सादर करता येणार असून अर्जांची छाननी झाल्यानंतर जूनमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी निविदा सादर करण्याची मुदत 10 मेपर्यंत होती.

म्हाडाने मालाड  मालवणी, चारकोप, विक्रोळीतील टागोरनगर आणि कन्नमवार नगर, शीव येथील प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी ओशिवरा अशा मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या 17 भूखंडांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे रुग्णालय, प्राथमिक शाळा, महाविद्यालय, खेळाचे मैदान, बहुद्देशीय समाज हॉल यासाठी हे भूखंड आरक्षित असून त्या आरक्षणानुसारच या भूखंडाचा वापर करता येणार आहे.

375 ते 400 कोटी रुपयांचा महसूल मिळणार 

विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडाच्या विक्रीसाठी म्हाडाने 45 हजार 300 रुपये प्रति चौरस मीटर ते 1 लाख 6 हजार 170 रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित केली आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना हे भूखंड वितरित करण्यात येतील. या माध्यमातून म्हाडाला तब्बल 375 ते 400 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;