‘सीबीएसई’मध्ये मुलींचीच बाजी!

‘सीबीएसई’मध्ये मुलींचीच बाजी!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी, बारावीचा निकाल जाहीर केला आहे. देशाचा दहावीचा निकाल 93.60 टक्के तर बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात 2.66 टक्क्यांनी वाढ झाली तर दहावीचा निकालात किंचित घट आहे.

देशभरातून दहावीला एकूण 22 लाख 38 हजार 827 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 20 लाख 95 हजार 467 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात 0.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. बारावीचे 14 लाख 26 हजार 420 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 87.98 आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेत 94.75 टक्के मुली तर 92.71 टक्के मुले आणि 91.30 टक्के ट्रान्सजेंडर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 2.04 टक्क्यांनी अधिक आहे. तर बारावीत 91.52 टक्के मुली, 85.12 टक्के मुले आणि 50 टक्के ट्रान्सजेंडर विद्यार्थी उत्तीर्ण असून हे प्रमाण यंदा 6.40 टक्क्यांनी जास्त आहे. दोन्ही परीक्षांत मुलांपेक्षा मुलींची कामगिरी सरस आहे. यंदाही सीबीएसई बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही तसेच प्रथम तीन क्रमांकांवरील विद्यार्थ्यांना बोर्डाकडून पारितोषिकेही देण्यात येणार नाही. विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक निकाल

त्रिवेंद्रम विभागाचा बारावीचा निकाल 99.91 टक्के तर दहावीचा निकाल 99.75 टक्के आहे. पुणे विभागाचा दहावीचा निकाल 96.46 टक्के असून देशभरात पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. तर बारावीचा पुणे विभागाचा निकाल 89.78 टक्के असून देशभरात पुणे नवव्या स्थानी आहे. सर्वात कमी निकाल गुवाहाटी (दहावी) 77.94 टक्के आणि प्रयागराज (बारावी) 78.25 टक्के आहे.

महाराष्ट्राचा निकाल

बारावी

बसलेले एकूण विद्यार्थी 32,346

उत्तीर्ण एकूण विद्यार्थी 29,036

मुले 15,204
मुली 13,832
एकूण निकाल 89.77
दहावी
बसलेले एकूण विद्यार्थी 107655
उत्तीर्ण एकूण विद्यार्थी 103916
मुले 59174
मुली 44742
एकूण निकाल 96.53

– दहावीचे विद्यार्थी गुणपडताळणीसाठी 20 ते 24 मे दरम्यान अर्ज करू शकतील. उत्तरपत्रितेच्या पह्टोकॉपीसाठी 4 व 5 जूनदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. या दोन्हीसाठी 500 रुपये फी आकारली जाईल.

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज

ऑनलाईन पद्धतीने 9 व 10 जून रोजी स्वीकारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी 100 रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

– बारावीचे विद्यार्थी गुणपडताळणीसाठी 17 ते 21 मे यादरम्यान अर्ज करू शकतील. प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच उत्तरपत्रितेच्या पह्टोकॉपीसाठी 1 व 2 जूनदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. त्यासाठी 700 रुपये शुल्क घेण्यात येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज 6 व 7 जून रोजी स्वीकारले जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;