भाजपच्या उमेदवारानं मुस्लिम महिलांना ओळखपत्र मागितलं; तपासणीसाठी बुरखा हटवण्यास सांगितल्यावरून वाद
Lok Sabha Election 2024: हैदराबादमधील भाजपच्या महिला उमेदवार माधवी लता या एका व्हिडीओमध्ये मतदान केंद्रावर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. बुरखे हटवून त्यांच्या मतदार ओळखपत्रावरील छायाचित्रांशी चेहरा जुळतो आहे का हे तपासताना दिसत आहे. या घटनेनंतर आता वाद चिघळण्याची शक्यता आहे.
भारतीय दंड संहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने X वर एका पोस्टमध्ये पुष्टी केली आहे की भाजप उमेदवाराविरुद्ध मलकपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी माधवी लता यांचा समावेश आहे. हैदराबादमधून चार वेळा खासदार राहिलेल्या आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी या प्रबळ उमेदवाराच्या विरोधात त्यांची लढत आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी रोनाल्ड रॉस यांनी सांगितलं की माधवी लता यांच्या विरोधात पोलीस एफआयआर नोंदवणार आहेत कारण कोणत्याही ‘उमेदवाराला’ त्यांची ओळख तपासण्यासाठी कोणाचा बुरखा उचलण्याचा अधिकार नाही. जर शंका असेल तर उमेदवार मतदान अधिकाऱ्याला मतदाराची ओळख पडताळून पाहण्यास सांगू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List