सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची मतदान केंद्रात घुसून मनमानी, अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप
सोमवारी राज्यातील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. उन्हाच्या तडाख्याला न जुमानता मतदारांनी मतदान केलं. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रात घुसत मनमानी कारभार होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एक्स पोस्टवर व्हिडीओ शेअर करून सत्ताधाऱ्यांकडून मतदारांवर दबावतंत्राचा वापर होत असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे. कोल्हे यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे, त्यामध्ये मतदान केंद्रात गोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. पोलिंग एजंट आणि निवडणूक अधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील संवाद झाल्याचं दिसत आहे.
ठाकरवाडी (शिरोली, खेड)
500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही!
असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ… pic.twitter.com/ZIgtlWJwDJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2024
शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अजित पवार गटातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लिपचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आलं आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.तसेच, आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ परिसरातील घड्याळ चिन्ह असलेल्या स्लिपचे वाटप बंद करण्याचं तसंच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनंतीही कोल्हे यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
ठाकरवाडी (शिरोली, खेड)
Comment List