निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेस्टने थकवले 600 कोटी

निवृत्त कर्मचाऱ्यांचे बेस्टने थकवले 600 कोटी

बेस्टने निवृत्त कर्मचाऱयांचे तब्बल 600 कोटी रुपये थकवले आहेत. बेस्टनेच ही माहिती उच्च न्यायालयाला दिली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. निवृत्त कर्मचाऱयांना थकबाकीतील 30 टक्के रक्कम तीन महिन्यांत द्या, असे आदेश न्यायालयाने बेस्टला दिले आहेत.

न्या. नितीन जामदार व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. थकबाकी देण्याची जबाबदारी बेस्ट महाव्यवस्थापक यांची असेल. उर्वरित 70 टक्के रक्कम कशी द्यावी, याचे आदेश पुढील सुनावणीत दिले जातील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

निवृत्त कर्मचाऱयांची ग्रॅच्युइटी व अन्य रक्कम बेस्टने थकवली आहे. याचा नाहक त्रास निवृत्त कर्मचाऱयांना होत आहे. ही रक्कम कशी दिली जाणार याची कोणतीही हमी बेस्टने दिलेली नाही. ही रक्कम कधी दिली जाणार याची माहिती सादर करण्यासाठी बेस्टला पुरेसा वेळ दिला होता. बेस्टने ही माहिती सादर केली नाही. त्यामुळे आम्ही हे आदेश देत आहोत, असे न्यायालयाने नमूद केले. 9 ऑगस्ट 2024 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

आमची आर्थिक अडचण आहे. दैनंदिन खर्च आम्हाला परवडत नाही. या याचिकेत पालिका प्रतिवादी आहे. याबाबत पालिकेला योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती बेस्टने न्यायालयाकडे केली. यासंदर्भात माहिती सादर केली जाईल, असे पालिकेने सांगितले. बेस्टची स्थापना पालिकेअंतर्गत झाली आहे. दोन्ही संस्था संविधानिक आहेत. दोघांनीही आदर्श संस्थेसारखे वागायला हवे, अशी कानउघडणी न्यायालयाने केली.

काय आहे प्रकरण

बेस्टने देणी थकवल्याने काही निवृत्त कर्मचाऱयांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत बेस्टने 600 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती न्यायालयाला दिली.

200 मधून 2 कोटी देणार

पालिकेने बेस्टला 200 कोटी रुपयांची मदत केली आहे. या पैशातून काही देणी भागवली आहेत. यातील 1 किंवा 2 कोटी रुपये निवृत्त कर्मचाऱयांची थकबाकी देण्यासाठी दिले जातील, असे बेस्टने न्यायालयाला सांगितले. त्यावर संतप्त होऊन न्यायालय म्हणाले, आम्ही आदेश देऊनही थकबाकी देण्याबाबत बेस्ट गंभीर दिसत नाही. पण निवृत कर्मचाऱयांना होणाऱया त्रासाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी सक्त ताकीद न्यायालयाने बेस्टला दिली.

न्यायालयाने फटकारले

निवृत्तीनंतर दिली जाणारी रक्कम म्हणजे चॅरिटी नाही. कर्मचाऱयांचे हक्काचे पैसे असतात हे बेस्ट व महापालिकेने विसरू नये, असे न्यायालयाने फटकारले. कर्मचाऱयांची थकबाकी देण्यासाठी बेस्ट पालिकेची मदत घेऊ शकते. पालिकेने बेस्टच्या विनंतीचा विचार करावा, अशी सूचना न्यायालयाने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;