घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक जण अडकल्याची भीती, 7 ते 8 जण जखमी

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक जण अडकल्याची भीती, 7 ते 8 जण जखमी

सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात दाटून आलं आणि धुळीचं वादळ सगळीकडे पसरलं. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊसही मुंबईच्या अनेक भागात कोसळला. दरम्यान, या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोलपंपावरील होर्डिंग कोसळलं.

या होर्डिंगच्या खाली सुमारे 150 ते 200 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;