माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा

माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारासंघात मतदान होत आहे. या 11 मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, रावेर, पुणे, बीड, नंदुरबार, नगर, शिरूर, जालना, जळगाव आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे, असे खैरे म्हणाले.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करून जे लोक गेले आहेत. जनतेत त्यांच्याबाबत रोष आहे. गद्दार माझ्याविरोधात उभे आहेत. त्यामुळे माझ्यासमोर कोणाचेच नाही. जनतेने आता निवडणूक आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मी सहाव्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;