मुंबईत वादळी पावसाचा धुमाकूळ; रेल्वे वाहतूकीचा खोळंबा, रस्ते वाहतूक संथ गतीनं
मुंबई आणि उपनगरासह नवी मुंबई, ठाणे परिसराला सोमवारी दुपारी वादळी पावसाने झोडपले. अनेक भागात झाडं कोसळल्यानं रस्ते वाहतूकीला त्याचा फटका बसला आहे. तर मुंबईची लाइफ लाइन असलेली रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या अर्धा तास उशिरानं धावत आहे. यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. रेल्वेकडून X वर त्याची माहिती देण्यात आली आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत आहे.
Due to sudden Rains with gutsy winds, Main line and Harbour line suburban services are running behind schedule.
— Central Railway (@Central_Railway) May 13, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List