आगोटीमुळे सुक्या मासळीच्या मागणीत वाढ; सुक्या मासळीचे दर कडाडले

आगोटीमुळे सुक्या मासळीच्या मागणीत वाढ; सुक्या मासळीचे दर कडाडले

कोकणात सुक्या व ओल्या मासळीची वेगळीच क्रेज आहे. सुकी मासळी साठवन करण्यासाठी महिला अधिक आग्रही असतात.त्यातही पावसाळा जवळ आला असल्याने हर्णे बंदरात सुक्या मासळीची अगोटसाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी कमालीची वाढली आहे. त्यामुळे साहजिकच सुक्या मासळीचे दर चांगलेच कडाडले आहेत.

मत्स्य प्रजोत्पादनाचा काळ लक्षात घेत शासनाकडून दरवर्शीच 1 जून पासून पुढील दोन महिने पावसाळयात समुद्रातील मासेमारी कायदयाने बंद ठेवण्यात येते. त्यामुळे मासेमारी बंदीच्या काळात मांसाहार खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय व आधार असतो. चालू हंगामात एलईडी लाईटव्दारे करण्यात आलेली मासेमारी, पर राज्यातील मलपी फास्टर मासेमारी बोटींचा महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत वाढलेला प्रचंड वावर आणि त्यामुळे कमी प्रमाणात मिळणारे मासे अशा या विविध कारणामुळे सुक्या मासळीचे दर या वर्षीच्या हंगामात चांगलेच कडाडले आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यात विविध कारणांमुळे भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. त्यामुळे ओल्या भाज्यांचे भाव गगनाला जावून भिडतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते खवय्यांच्या खिशाला परवडणारे नसतात. अशा वेळी घरात साठवुन ठेवलेली सुकी मासळी काढली जाते.

पावसाळयात खाण्यासाठी सुकी मासळी खरेदी करते. घरच्या सर्व मंडळींना जेवणात मासे, मटण नसले तर सुकी मासळी आवर्जून लागते. त्यामुळे किंमत वाढलेली असली तरी सुकी मासळी थोडया फार प्रमाणात खरेदी केली आहे.
तृप्ती तृषांत भाटकर, आंजर्ले, ता. दापोली, खवय्ये

सुक्या मासळीचे प्रतिकिलो दर

– सुके सोडे 1600 रूपये प्रति किलो
– सुके बोंबील 700 रूपये प्रति किलो
– खारा बांगडा 20 रुपयांना फक्त एक नग
– सुकी आंबड 600 रुपये प्रति किलो दर
– सुका कोलीम 250 रुपये पायली
– सुकी बगी 700 रूपये किलोचा दर
– सुकी म्हाकुळ 700 रुपये प्रति किलो
– बारीक वाकटी 400 रुपये किलो
– सुकी मांदेली 100 रूपये वाटा
– सुकी लेपा 150 रूपये वाटा
– सुकी ढोमी 200 रूपये वाटा
अशाप्रकारे सुक्या मासळीचे हर्णे बंदरातील सध्याचे दर आहेत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;