केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करण्याचा याचिकाकर्त्याला कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका आज फेटाळली. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना याप्रकरणी काही कारवाई करायची असल्यास त्यांनी ती करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ाचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अंतरिम जामिनावर आहेत. 21 मार्च रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. अटकेनंतर केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोक्षी पक्षातील नेत्यांनी लावून धरली होती. परंतु केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. याप्रकरणी संदीप पुमार नावाच्या व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावत याचिका फेटाळली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय
याचिकेत कायदेशीर अधिकारांबाबत मागणी काय आहे, यात आम्हाला पडायचे नाही. कदाचित तुम्हाला याप्रकरणी आम्हाला काहीतरी सांगण्यासारखे असेल. परंतु आम्ही ही याचिका फेटाळत आहोत, असे खंडपीठ म्हणाले.

दिल्ली हायकोर्टाने काय म्हटले होते?
दिल्ली हायकोर्टाने 10 एप्रिल रोजी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. तसेच वारंवार ही याचिका दाखल करू नका. हा काही जेम्स बॉण्डचा चित्रपट नाही ज्याचे अनेक भाग निघू शकतात, अशा शब्दांत दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;