बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कु्मार मोदी यांचे निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कु्मार मोदी यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कु्मार मोदी यांचे आज कर्परोगाने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशील कु्मार मोदी यांचे पार्थिव उद्या त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एप्रिल महिन्यात त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती सुशील कु्मार मोदी यांनीच दिली होती. प्रपृतीच्या कारणामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही तसेच निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. सुशील कु्मार मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बरीच वर्षे विद्यार्थी राजकारणात काम केले. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवरून सुशील कु्मार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनामुळे बिहार भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;